मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

 

वेद, उपनिषद, पुराण, रामायण ते महाभारत




 

जगातील सर्व ज्ञान वेदांमध्ये ठाई-ठाई भरलं आहे.  ऋग्वेद’, सामवेद’, यजुर्वेद’, अथर्ववेद हे ४ वेद सनातन धर्माचे धर्मग्रंथ आहेत. संस्कृत भाषेमध्ये रचल्या गेलेल्या अनेक ऋचांचा संग्रह म्हणजे वेद.  वेद हे अपौरुषे आहेत.  ते कोणी एका व्यक्तीने रचलेले नाहीत.  ते एका वेळी रचलेले नाहीत. असंख्य ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये, अनेक वर्षांच्या तपश्चर्येने जे निष्पन्न झाले आहे ते वेदांमध्ये सामावले आहे.  आजच्या भाषेत बोलायचे झाले तर अनेक रिसर्च स्कॉलर्सनी त्यांच्या रिसर्च लॅबोरेटरी मध्ये अनेक वर्षांच्या रिसर्चने, संशोधना अंती जे निष्कर्ष काढले आहेत ते वेदांमध्ये सामावले आहेत.


पूर्वीच्या काळी अनेक ऋषींचे आश्रम असायचे.  हे ऋषी जरी अनेक विषय जाणायचे तरी खास करून एखाद्या विशिष्ट विषयात अधिक रुची ठेवायचे.  त्यांचा आश्रम म्हणजे एक प्रयोगशाळाच होती.  तसं ते एक विद्यापीठ देखील होतं. या आश्रमात साहित्य, व्याकरण, संगीत, कला, धर्म, संस्कृती, राजकारण, अर्थकारण, युद्धकला, शस्त्र-अस्त्रनिर्मिती, विज्ञान, औषध शास्त्र, चिकित्सा शास्त्र, खगोल विज्ञान, दी असंख्य विषयांवर सातत्याने संशोधन चालू असायचं. आणि या संशोधनातून जो निष्कर्ष निघायचा तो वेदांमध्ये समाविष्ट व्हायचा. अशा रीतीने वेदांच्या ऋचा वाढत गेल्या.


दर बारा वर्षानंतर होणाऱ्या प्रयागराज मधील कुंभात तसेच उज्जैन’, ‘नाशिकहरीद्वार येथील लघु कुंभात हे सारे तपस्वी, ऋषी, मुनी एकत्र यायचे आणि त्यावेळी त्यांच्या आश्रमात म्हणजेच प्रयोगशाळेत जे निष्कर्ष निघाले  त्यांचे सादरीकरण म्हणजेच आजच्या भाषेत प्रेझेंटेशन व्हायचे.  यावर सांगोपांग चर्चा व्हायची.  अनेक प्रश्न आणि उपप्रश्न विचारले जायचे.  प्रबंध सादर करणाऱ्या ऋषीला या साऱ्या प्रश्नांची  पटतील अशी उत्तरे द्यावी लागायची. आणि एकदा का निष्कर्ष सर्वांना मान्य झाला की त्याचे रूपांतर संस्कृत ऋचे व्हायचे  व नंतरच ही ऋचा चार वेदांपैकी जो त्या विषयाला अनुरूप असेल अशा वेदात समाविष्ट व्हायची.


वेद हे ज्ञानाचे भांडार होते.  परंतु ते ज्ञान सर्वसामान्य माणसाला समजणं कठीण होतं.  सर्वसामान्य माणसाला ते कळावं म्हणून वेदांचा एक सोपा फॉर्म म्हणजे उपनिषद. वेदांमध्ये असलेलं ज्ञानजे सामान्य माणसाला आवश्यक आहेते उपनिषदामधून लोकांपर्यंत पोहोचविण्याचाही प्रयत्न झाला. सनातन धर्मात १०८ विविध 'उपनिषद' आहेत. त्यातील  ‘ईश’, ‘कठ’, ‘तैत्तिरीय बृहदारण्यक ही यजुर्वेदावर आधारीत, ‘केन छांदोग्य ही सामवेदावर आधारीत, ‘प्रश्न’, ‘मुंडक  मांडूक्य ही अथर्ववेदावर आधारीत तर ऐतरेयहे ऋग्वेदावर आधारीत १० उपनिषद मुख्य मानली गेली आहेत. जी देखील ज्ञानाची भांडारेच आहेत.


परंतु ज्या लोकांना 'उपनिषद' ही समजण्यात अडचण आली त्यांच्यासाठी आपल्या पूर्वजांनी आणखीन एक सोपा मार्ग शोधला.  तो म्हणजे पुराण. आपल्या सनातन धर्मात विष्णुपुराण, पद्मपुराण, ब्रह्मपुराण, शिवपुराणभागवतपुराणनारदपुराणमार्कंडेयपुराणअग्निपुराणब्रह्मवैवर्तपुराणलिंगपुराणवराहपुराणस्कंदपुराणवामनपुराणकूर्मपुराणमत्स्यपुराण, गरुड़पुराण, ब्रह्मांडपुराण व भविष्यपुराण ही १८  पुराणे सांगितली आहेत. यात देखील उपनिषदांमध्ये सांगितलेलं ज्ञानआणखीन सोपं करून सांगितलं आहे.  


परंतु ज्या लोकांना पुराणही समजण्यात अडचण आली त्यांच्यासाठी आपल्या पूर्वजांनी आणखीन एक सोपा मार्ग शोधला.  तो म्हणजे रामायण आणि महाभारत’. या महाकाव्यात देखील वेदांमध्ये सांगितलेलं ज्ञानजे उपनिषदामध्ये सोपं करून सांगितलं, जे पुराणांमध्ये आणखीन सोपं करून सांगितलं  ते  आपल्याला रामायण आणि महाभारतामधील अतिशय सोप्या गोष्टींमधून मिळू शक.


रामायण आणि महाभारतामधील प्रत्येक गोष्ट ही काही मनोरंजनासाठी तयार केलेली गोष्ट नाही.  प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काहीतरी बोध देते. किंबहुना सर्वसामान्य माणसाने यातून ज्ञान अथवा बोध घ्यावा हीच रामायण आणि महाभारत या दोन पवित्र ग्रंथामागील कल्पना आहे.  परंतु रामायण आणि महाभारत याला जर आपण कादंबरी समजायला लागलो तर मग मात्र रामायण आणि महाभारताचा मूळ उद्देशच संपुष्टात येतो आणि पालथ्या घड्यावर पाणी पडते.


यापुढे रामायण आणि महाभारतामधील विविध कथा संक्षिप्तपणे सांगून त्यातून आपण काय बोध घेऊ शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.  आपणा सर्वांना हा प्रयत्न आवडेल याची खात्री आहे.

 




 

२ टिप्पण्या:

  सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक'       पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल.   तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...